अंधारछाया - 11

  • 5.9k
  • 2.4k

अंधारछाया अकरा दादा शेठचा फोन आला म्ह्णून ऑफिसमधून गेस्ट हाऊसवर गेलो. परत येता येता आठ वाजले रात्रीचे. मंगलाला म्हणालो, ‘शेठ हरिपाठाच्या अभंगाचे पारायण करणार आहेत. वासुदेवराव जोश्यांना बोलावलय प्रवचन करायला. विठोबाच्या देवळात पुढच्या महिन्यात सुरवात करणार आहेत.’ जेवणं झाली तशी मंगला म्हणाली, ‘आम्ही जाऊन आलो गुरूजींकडे. त्यांना सांगितले हे स्वप्नांचे.’ तसे म्हणाले, ‘ही चांगली गोष्ट आहे. आपल्या जपाने बरीच प्रगती झाली आहे असे समजा. कारण ह्या अवस्थेत जी स्वप्ने, जे विचार, बेबीला येत होते, याचे भान तिला आधी नसे. आता तिला तिच्या स्वप्नांची कल्पना आलीय. आता ती स्वप्ने ही कमी होतील तशी तिची बरीच सुटवणूक होईल.’ मला खूपसं हायसं वाटलं.