.प्रकाशमय झाली दिवाळी.... आज त्याला तिची प्रकर्षाने आठवण येत होती. तो बसला होता एका अंधारलेल्या खोलीत खिडकीतून बाहेर बघत आपल्याच अश्रूंना वाट मोकळी करून देत... ती होती आजूबाजूला... दिवाळीच्या दिव्यांचे तेजोवलय त्याच्या डोळ्यांना खटकत होते... तो कोसत होता मनाला का हा दिव्यांचा सण लोकं साजरा करतात? ... या दिव्यांनी तर माझं अस्तित्व माझ्यापासून हिरावून घेतलं... माझा जीव.. माझं काळीज... माझ्यापासून दूर नेलं... नका लावू रे दिवाळीला दिवे... तो मनातल्या मनात आक्रोश करत होता... जळत होता आतल्या आत दिव्यातल्या वातीसारखा.. तेवढ्यात अचानक मयुरी त्याच्यासमोर आली व म्हणाली, "अरे समीर, काय हे... ऐन दिवाळीत तू असा काळोख