शोध चंद्रशेखरचा! - 21

(18)
  • 6.6k
  • 2.9k

शोध चंद्रशेखरचा! २१--- सकाळी इरावती ऑफिसात पोहंचली. कामाचा ढीग तिची वाट पहात होता. आशाने सगळे रिपोर्ट्स तिच्या टेबलवर व्यवस्थित रचून ठेवले होते. काल तीन मृतदेह कोल्ड स्टोरेजच्या गोडाऊन मध्ये सापडले होते. त्यातील तिच्या अपेक्षेप्रमाणे एक चंद्रशेखरचा होता. बाकी दोघांचीही ओळख पटली होती. एक, त्या कोल्ड स्टोरेजचा मालक पीटर होता. ड्रग्ज ट्रांस्पोर्टेशनच्या संदर्भात त्याचे बरेच रेकॉर्ड पोलिसात तयार होते. दुसरा सुलेमान होता. अनेक गुन्ह्यात, तो पोलिसांना हवा होता. बांगलादेश, नेपाळ बरोबरच तो, दोनदा पाकिस्तानातही जाऊन आला होता. दुबईला तर नेहमीच! माणिकचे फारसे पोलीस रेकॉर्ड नव्हते. 'मी माणिक' याव्यतिरिक्त त्याची कोठेच नोंद नव्हती! हा आणि विकी अश्या केस मध्ये कसे आलेत? हे