सौदागिरीन

  • 8.5k
  • 3.1k

सौदागिरीन "आई, मला नाश्ता दे. मला इंटरव्यूव्ह साठी जायचं आहे". "थांब थोडी, बाबांना डब्बा देते, त्यांना उशीर होईल". "आई तुला समजत कसं नाही, अगं माझी इंटरव्यूव्ह आहे आज. आणि हे तरी जाऊन काय करणार आहेत? लिफ्टच चालवणार ना?" "नलू अगं काय बोलतेस? त्यांच्या लिफ्ट चालवल्या मुळेच आपण जगत आहोत. त्यामुळेच तू शिक्षण पूर्ण करू शकलीस ना?" "हो, माहित आहे. काय दिवस काढले आहेत आणि काय काढीत आहोत...ते मी पण बघितले आहे आणि तू पण... आई मला एक समजत नाही कि जे लोक आपल्या बायका-मुलांना व्यवस्थित सांभाळू शकत नसतात, त्यांच्या गरजा पूर्ण करू शकत नसतात ते लग्नच का करतात?" "नलू ...काय