अंधारछाया - 12

  • 6.6k
  • 2.7k

अंधारछाया बारा मंगला संक्रांतीचे तिळगूळ, गुळाच्या पोळ्या, सगळं यथास्थित झाले. आपले दहा पंधरा दिवस बरे गेले म्हणायचे असे मनात आले. त्या दिवशी ती विहिरीकडे गेली. यानंतर दरवाजाकरून घेतला रहाटाच्या खालच्या जागी. त्याला कुलुपाची व्यवस्था केली. तेंव्हा हायसे वाटले. पण तेंव्हा पासून बराच फरक पडलाय तिच्यात. एक प्रकारचा अल्लडपणा आलाय असे वाटले. गुरूजींना भेटून सांगितले. तसे ते म्हणाले, ‘आता महत्वाची पायरी आली आहे. हीच तिची मानसिक स्थिती तिला सोडवणार आहे आपल्या जंजाळातून. पण चुकून पुन्हा निराशा वाटली तर मात्र खंड पडेल बरे व्हायला.’ परवा म्हणाली, ‘मी माझ्या मैत्रिणीला पत्र पाठवणार आहे.’ पण मग बराच वेळ थांबून लिहिलेन ते आईला पत्र. मला