कॉफी

  • 5k
  • 1.7k

कॉफी दुपारचे पाच वाजले होते, दादासाहेबांना वरहंड्यातील आराम खुर्चीवर बसुन पुस्तक वाचता वाचता झोप लागली होती, अंगणातल्या मोठं मोठ्या झाडांच्या सावलीत ते पहुडले होते.. वेलींच्या त्या गर्दीतून सुर्यदेवाची नजर एखादेच वेळी त्यांच्या आराम खुर्चीपर्यंत पोहचत असे. नाहीतर मंद वारा हा अंगणभर फिरत असे. तेवढ्यात त्यांची कॉफी घेऊन हरी तिथे आला, त्यांना दादा म्हणून हाक मारताच दादा तंद्रीतून जागे झाले, त्यांची झोप मोड झाली, पण हल्ली त्यांचं दुपारचं अस झोपणं वाढलं होतं. म्हणून त्यांनी हरीला नित्याने दुपारच्या पाच वाजता कॉफी घेऊन यायला सांगितलं होत. त्यांचं आयुष्य आता फक्त पुस्तकं,