नीराजनाची ज्योत...

  • 7.9k
  • 3.2k

सीताबाई बाहेर आली. तांबडं फुटून दिवस वर आला तरी आज तिचं अजून आटपायचं होतं. गोठ्यातली गंगु हंबरून हाकारे देत होतीं. दावणीचं वासरूही भुकेने कासावीस झालं होतं. आले रे सोन्या.. आज जरा उशीरच झाला बघ मलाही... सीताक्काने वासराला प्रतिसाद दिला. सीताक्का हे तिचं गावातलं नाव. तळकोकणातल्या छोट्याशा खेड्यात काहीशा जंगलातच सीताक्केचं घर. आता ती एकटीच होती. पूर्वी घर भरलं होतं तेव्हा लगबग असे. आता मुलं, सुना,लेकी, नातवंडं शहरात, पती देवाघरी आणि सीताक्का या घरात एकटीच.कोकणातल्या अनेक गावातल्या अनेक बायकांसारखी ती ही शूर. वाघरूही यायचं अधी मधी पण शूर सीताक्का त्यालाही विळ्याच्या धाकानं पळवून लावी. पण आता नजर जरा वयानुसार कमी झाली