लॉकडाऊन

  • 11k
  • 1
  • 4.6k

' आई, लई भूक लागली, काही तरी दे की खायला ...? ' भुकेच्या व्याकुळेने लहान पोरं ओरडून ओरडून आईला सांगत होती. ती आई तरी काय देणार बिचारी, घरात होतं नव्हतं सर्व संपलं होतं, खायला तिचं शरीर तेवढं राहिलं होतं. ती देखील शून्य नजरेने घराच्या छताकडे पाहत होती. तिच्या पोटात देखील कावळे ओरडू लागले होते, भूक लागली म्हणून ती कोणाला सांगणार होती ? तिचा धनी बाजारात गेला होता काही खायला मिळेल का याचा शोध घेण्यासाठी. तास दोन तास झाले तरी धनी काही येत नव्हता, ती आपल्या बाळाची समजूत काढत होती, ' रडू नको माय, येतीलच बाबा आता, काही तरी घेऊन.....!' सायंकाळची