कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन ..- 10

  • 8.2k
  • 2
  • 3.7k

का ? कादंबरी –प्रेमाविण व्यर्थ हे जीवन भाग – १० वा ---------------------------------------------------------------- गेल्या वेळी झालेल्या भेटीचा दिवस आठवण्यात अनुषा वेळेचे भान हरपून गेली होती. अभिजितजवळ आपले मन मोकळे केले ते बरेच झाले , त्यामुळे तर ,स्वारीने आपल्याला प्रतिसाद देत मनातले प्रेम कबुल केले आहे खरे . आणि वर वास्तवाची जाणीव करून देत म्हटले .की .. मी –सागर देशमुख नावाच्या एक अतिश्रीमंत –कर्तबगार व्यक्तीचा मुलगा आहे , पण, याच सागर देशमुख नावाच्या व्यक्तीचे ..पारिवारिक स्वरूप ..ते मात्र अकल्पनीय आहे , अशा माणसाची सून होणे “, अभिजीतच्या आईचे आणि त्यांचे घरातील नाते-संबंध ..अभिजीतच्या बहिणीशी .. म्हणजे स्वताच्या मुलीशी असलेले नाते तोडून ..तिला