कोणी बोलावले त्याला? (भाग 1)

(25)
  • 25k
  • 4
  • 14.3k

कोणी बोलावले त्याला ? श्याम आणी किशोर दोघे लहानपणा पासूनचे मित्र. बाजूबाजूला राहणारे , एकाच शाळेतून , कॉलेज मधून शिकलेले. अतिशय जवळचे मित्र. आता दोघे कामाला लागले होते. पण तरीही न चुकता दोन चार दिवसात एकमेकांकडे फेरी ही ठरलेली. आई वडिलांन पासून सगळ्या कॉलनीला त्यांची मैत्री माहित होती. मार्च एंडिंग संपली. आणी दोघांनी काहीसा सुटकेचा श्वास सोडला. ह्या मार्च एंडिंग मध्ये बॉस नी त्यांचा चांगलाच घाम काढला होता. जास्त किशोर वैतागला होता. त्याचा बॉस एक नंबरचा खडूस... मग काय ? किशोरला त्यांनी चांगलाच राबवून घेतला होता. " खूप कंटाळा आलाय रे...." नेहमी प्रमाणे