अंधारछाया - 15 - अंतिम भाग

  • 5.4k
  • 1.8k

अंधार छाया पंधरा शशी लाकडं जमवायला पोर येत होती. सकाळपासून मी माझी बॅट, स्टंपा आत टाकल्या कोठीच्या खोलीत. बागेतल्या कॉटच्या फळ्या घरात टाकल्या आणि फाटकाशी होतो लक्ष ठेऊन. कुणी पोरं येत नाहीत ना पहायला! मन आत होते. मावशीपाशी. गेल्या अमावास्येपासून पंधरा दिवसात बोलत नव्हते कुणी फार. दादा रामायणाचे वाचन करीत, ऑफिसमधून आले की. आई मावशीकडून जपाच्या माळा करून घेई. कुणीच कुणाशी गप्पा मारत नव्हते. ना हसून खेळून होते. त्यात आज पौर्णिमा. दादा आईला सांगत होते, ‘आज पुन्हा जपले पाहिजे तिला म्हणून.’ परवा माझ्याच्याने राहाववले गेले नाही. मावशीची गोष्ट मी मित्रांना सांगायला लागलो, स्टेशनवरून फिरून येताना. सुभ्या म्हणाला, ‘भिती वाटतेय, पण