माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी - 21

  • 5.1k
  • 1.8k

२१ वाजवा रे वाजवा! केव्हातरी लागली असावी झोप.. सकाळी जाग आली कशीतरी. आज लग्न. उशीरा उठून चालायचे नाही. काकाच्या शिस्तीत सारे काही त्याच्या आॅर्डरप्रमाणेच व्हायला हवे. सारी जबाबदारी माझ्यावर. काकाचे काम ही कसे.. फुलवाल्याकडून सकाळी साडेसातास फुले घेऊन येणे.. गुलाबाची फुले शंभर मोजून घेणे.. नशीब प्रत्येक फुलाच्या पाकळ्या मोजून घेणे नाही लिहिले! वाजंत्रीवाल्यांना आठ वाजून वीस मिनिटानी फोन करून आठवण करून देणे .. सनई वादकांस कोणकोणते राग वाजवणे याची यादी देणे.. भटजीबुवांना सकाळी नऊ वाजून आठ मिनिटांनी फोन करून आठवण करून देणे.. आणि नऊ पंचावन्नला घेऊन येणे.. भटजीबुवा मंत्र विसरले नाहीत याची खात्री निघण्यापूर्वी करून मगच त्यांना घेऊन