लघुकथा -बापुमामा --------------------------------------------------------------------------------------- गावापासून आपण जितके दुरावतो ,तितके आपले मन गावाकडच्या आठवणीत रमत असते. आता हेच पहा ना ,किती तरी वर्ष झालीत मला गाव सोडून पण अजूनही माझे मन काही केल्या मोठ्या शहरात रमत नाही , एखादेवेळी एकटे, निवांत बसलं की, माझे मनपाखरू झेपावते गावाकडे आणि जाऊन बसते माझ्या गावातील बापुमामाच्या फाट्यावर असलेल्या होटल मध्ये . याच बापुमामाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे . माणूस लहान असो, थोर असो ,सामान्य माणसे आपल्या वागण्या-बोलण्याने ,आचरणाने प्रेरक ,आशादायी व्यक्तिमत्व बनत असतात . सामान्य माणसात ही असामान्य वाटावे असे प्रेरक गुण असतात ,हे तुम्हाला बापुमामाची गोष्ट ऐकून नक्कीच वाटेल. तीस –चाळीस वर्ष तरी होऊन