प्रेम भावनेचा मृदू रंग भरणारा व्हायरस - 6

  • 8.7k
  • 2.9k

क्रमशः-६.भाऊ- " तोंडातून आवाज येत नाही. पोट फुगलंय. गाडीत डोळे झाकून गप्प पडून आहेत. बर त्या मेडीकलवाल्या बाई आल्या आहेत. आता मेडीकल उघडायचं चाललंय. गोळ्या घेतो. आता ठेव फोन आणि काळजी करू नकोस. सगळं ठिक होईल. मी तुला घरी गेल्यावर फोन करतो." असे म्हणून त्याने फोन ठेवला. रात्री जेवण करायला बसलो होतो, ते जेवणाचं ताट तसंच पडून होतं. जेवनाचा खरकटा हात धुवायचं देखील भान विसरून गेलो होतो. पुन्हा जेवायची इच्छा नव्हती. दादांच्या काळजीनं पोटात सतत कालवाकालव होतं होती. मन शांत बसत नव्हतं. झोप तर केव्हाच उडाली होती. पुन्हा अर्ध्या पाऊण तासाने भाऊला फोन केला, पण आत्ता त्याचा फोन बंद लागायला