आजारांचं फॅशन - 3

  • 7.6k
  • 3k

अनिल देखील मित्रां सोबत बाहेर पडला, बाकीचे सगळे काही ना काही एकमेकां सोबत बोलत होते पण अनिल मात्र शांत पणे चालत होता. "गोरे साहेब काही तरी करा आता, डोकं पकडलंय, थोडी थोडी मारली पाहिजेल" घोरणे पप्या अनिलच्या खांद्यावर हात टाकत अनिलला बोलला. "मी का करू, लग्नाला आलायस का माझ्या" अनिल ने पप्याचा हात खांद्यावरून झटकत तिखट टोला मारला. "एक काम करा सगळे काढा ना थोडे थोडे पैसे, ये निक्या तुझ्या कड किती आहेत" शार्दूल ने निखिल बहिरे कडे बघत जगातला सगळ्यात अवघड प्रश्न निखिलला विचारला. "अरे मयताला काय पैसे घेऊन येत का कोण?" निखिल बहिरे कडे पैसे न काढण्यासाठी प्रत्येक