स्वप्नाचा पाठलाग!-----भाग ४

  • 8k
  • 2.5k

"निनाद, तुम्हाला 'शकू' नावाची कोणी बाल मैत्रीण होती का?" डॉ. मुकुलनी सरळ मुद्यालाच हात घातला. या प्रश्नाने निनाद सटपटला. म्हणजे याला 'शकी' समजली तर? "हो! पण शाळेतली! का?""अशात ती तुम्हास भेटते का?""नाही! गाव सुटले तशी ती पुन्हा भेटली नाही!" डॉक्टरांचा आय कॉन्टॅक्ट टाळत निनाद म्हणाला. डॉ. मुकुलनी तो खोटं बोलत असल्याचे तात्काळ ओळखले. खरे तर स्वरालीचं शकीबद्दल त्याला विचारणार होती. पण ज्या अर्थी तो हुन सांगत नाही त्या अर्थी ते फारसे महत्वाचे नसावे, असे तिला वाटले. " तुम्हाला म्हणे एकच स्वप्न वारंवार पडत! असे स्वराली म्हणत होत्या!""तस ते फारस विशेष नाही! फार लहानपणा पसन ते कधीतरी पडतंय!" निनाद पुन्हा खोटं