राखणदार. - 1

  • 23.6k
  • 2
  • 15.3k

राखणदार. प्रकरण १ गावाबाहेर मोठ्या वडाच्या झाडाखाली गावातले काही रिकाटेकडे गप्पावीर तुक्या नरसू, शिवा आणि इतर दोनचारजण बसले होते. भरदुपारची वेळ असली तरी गर्द पानांमुळे झाडाखाली चांगली सावली होती. सूर्य डोक्यावर आला. कडकडून भूक लागलीय. मी बाबा घरी चाललो! शिवा म्हणाला. आणि उठू लागला. थांब की रे थोडा वेळ! एवढी कसली घाई ? नरसू त्याला थांबवत म्हणाला. गजाली मारत सकाळपासून बसलोय! अजून पुरे नाही झालं? माझ्या पोटात पण कावळे ओरडायला लागलेयत ! संध्याकाळी परत येऊ! तुक्यासुद्धा निघायच्या तयारीला लागला. अरे पण माझी मनीआॅर्डर यायचीय ! इथेच घेतली की थोडे पैसे माझ्या खर्चाला काढून ठेवता येतात. एकदा