Amita a. Salvi लिखित कादंबरी राखणदार. | मराठी सर्वोत्तम कादंबरी वाचा आणि पीडीएफ डाउनलोड करा होम कादंबरी मराठी कादंबरी राखणदार. - कादंबरी कादंबरी राखणदार. - कादंबरी Amita a. Salvi द्वारा मराठी सामाजिक कथा (83) 34.1k 46.6k 17 राखणदार. प्रकरण १ गावाबाहेर मोठ्या वडाच्या झाडाखाली गावातले काही रिकाटेकडे गप्पावीर तुक्या नरसू, शिवा आणि इतर दोनचारजण बसले होते. भरदुपारची वेळ असली तरी गर्द पानांमुळे झाडाखाली चांगली सावली होती. सूर्य डोक्यावर आला. कडकडून भूक लागलीय. मी ...अजून वाचाघरी चाललो! शिवा म्हणाला. आणि उठू लागला. थांब की रे थोडा वेळ! एवढी कसली घाई ? नरसू त्याला थांबवत म्हणाला. गजाली मारत सकाळपासून बसलोय! अजून पुरे नाही झालं? माझ्या पोटात पण कावळे ओरडायला लागलेयत ! संध्याकाळी परत येऊ! तुक्यासुद्धा निघायच्या तयारीला लागला. अरे पण माझी मनीआॅर्डर यायचीय ! इथेच घेतली की थोडे पैसे माझ्या खर्चाला काढून ठेवता येतात. एकदा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा पूर्ण कादंबरी राखणदार. - 1 9.3k 11.6k राखणदार. प्रकरण १ गावाबाहेर मोठ्या वडाच्या झाडाखाली गावातले काही रिकाटेकडे गप्पावीर तुक्या नरसू, शिवा आणि इतर दोनचारजण बसले होते. भरदुपारची वेळ असली तरी गर्द पानांमुळे झाडाखाली चांगली सावली होती. सूर्य डोक्यावर आला. कडकडून भूक लागलीय. मी ...अजून वाचाघरी चाललो! शिवा म्हणाला. आणि उठू लागला. थांब की रे थोडा वेळ! एवढी कसली घाई ? नरसू त्याला थांबवत म्हणाला. गजाली मारत सकाळपासून बसलोय! अजून पुरे नाही झालं? माझ्या पोटात पण कावळे ओरडायला लागलेयत ! संध्याकाळी परत येऊ! तुक्यासुद्धा निघायच्या तयारीला लागला. अरे पण माझी मनीआॅर्डर यायचीय ! इथेच घेतली की थोडे पैसे माझ्या खर्चाला काढून ठेवता येतात. एकदा आता वाचा राखणदार. - 2 7.1k 9k राखणदार प्रकरण -- 2 तेव्हा तानाजीरावांच्या वडिलांची मोठी बहीण --- दुर्गाआत्या आडगावात रहात होती. थोड्याच दिवसांपूर्वी तिच्या पतींचे माधवरावांचे हृदयविकाराने अचानक निधन झालं होतं. मुलं - बाळं नसल्यामुळे मोठ्या वाड्यात तिला एकटीलाच रहावं लागत होतं. रात्री सोबतीला एक गावातली ...अजून वाचायेत असे. आत्याचं तालुक्याच्या गावी प्राॅपर्टीचं काम होतं. तिनं फोन करून भावाला सोबत येण्याची गळ घातली कारण कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी नीट तपसणं महत्वाचं होतं. नारायणरावांनी स्वतः न जाता तानाजीरावांना पाठवलं. तिकडे धावपळ करायला तरूण माणूस असणं गरजेचं आहे असं त्यांचं मत पडलं. वडिलांचं म्हणणं तानाजीराव डावलू शकले नाहीत. सकाळी न्याहारीच्या वेळी ते आत्याकडे पोहोचले. ती त्यांची वाट पहातच होती. चहा- आता वाचा राखणदार. - 3 6.5k 8.5k राखणदार प्रकरण - ३ दरवाजा उघडून आत्या घरात आली." तू झोपला नाहीस? इथं का उभा राहिलायस?" तिनं आश्चर्यानं विचारलं. तिची मैत्रीण मात्र टक लावून त्यांच्याकडे बघत होती. जणू काही तिला काहीतरी जाणवलं होतं. ती सर्वसाधारण स्त्री वाटत नव्हती. कपाळाला ...अजून वाचाटिळा, गळ्यात तुळशीची माळ मुखात हरीनाम---- तिला ते आत्मे एवढे का घाबरत होते ; हे तिला पहाताच तानाजीरावांच्या लक्षात आलं. दुस-या दिवशी सकाळी निघताना कधी एकटी घरात रहाणार नाही; असं वचन त्यांनी आत्याकडून घेतलं होतं. "तू आमच्याकडे अनंतपूरला येऊन रहा! आताच चल माझ्याबरोबर! इथे एकटीने रहायची काय गरज आहे? " त्यांनी आग्रह करून पाहिला. त्यांना आत्याची काळजी वाटत होती, पण आता वाचा राखणदार. - 4 6.5k 8.8k राखणदार प्रकरण ४ तो माणूस काठी उगारून उभा आहे ; तो आता काठीचा आघात आपल्यावर करणार आहे हे तानाजीरावांनी पाहिलं; आणि सरळ-सरळ त्याला भिडले. त्या माणसानेही काठी फेकून दिली; आणि दोन हात करायला सुरूवात केली. काही वेळातच तानाजीरावांच्या लक्षात ...अजून वाचाकी 'तो ' सुद्धा कसलेला पैलवान होता. प्रत्येक डावाला त्याच्याकडून प्रत्युत्तर मिळत होतं. " एवढा मोठा पैलवान अजून पर्यंत आपल्याला कोणत्याच कुस्तीच्या फडात दिसला कसा नाही?" तानाजीरावांना आश्चर्य वाटत होतं. पण त्यांना एका गोष्टीचं आश्चर्य वाटत होतं त्याला मारलेले ठोसे त्याचं शरीर चुकवून भलतीकडे जात होते. त्याला कितीही पकडायचा प्रयत्न केला; तरी तो हातातून निसटत होता. "कशी कुस्ती शिकलाय हा आता वाचा राखणदार. - 5 - अंतिम भाग (54) 4.8k 8.8k राखणदार प्रकरण ५ "अहो! ही पेज तुमच्यासाठी बनवलीय! थोडीशी तरी पिऊन बघा! अंगात शक्ती येईल. तुम्हाला चवीला थोडं लिबाचं लोणचं पण देते! " कांता तानाजीने काहीतरी खावं म्हणून तिच्या परीने प्रयत्न करत होती. आपल्या पतीची गलितगात्र अवस्था बघून ओलावलेले ...अजून वाचानव-याला दिसू नयेत म्हणून खोटं हसत होती. "हो! दे मला थोडी पेज! पण आता नको. थोड्या वेळाने दे! " तानाजीला बायकोची काळजी कळत होती. पण इच्छा नसताना काही खावं असंही वाटत नव्हतं. "आता संध्याकाळ झालीय! तुम्ही दुपारीसुद्धा असाच बहाणा करून काही खाणं टाळलं! तुम्हाला काय खावंसं वाटतं; मला सांगा! मी बनवून देईन! पण असे उपाशी राहू नका! स्वत:ची तुम्ही काय आता वाचा इतर रसदार पर्याय मराठी लघुकथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी कादंबरी भाग मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Amita a. Salvi फॉलो करा