२३ विसरली हार ती का घरी? बाईकवर टांग मारून, प्यार का संदेसा घेऊन, एका ध्येयाने प्रेरित होऊन, वेडात दौडल्यासारखा निघालो मी. वै चा तो सोन्याचा हार नि माझे ते पहिलेवहिले प्रेमपत्र किंवा प्रेमचित्रपत्र घेऊन. आज विचार करून वाटते की तेव्हा आजच्या सारखे मोबाईल असते तर .. सारे किती सोपे झाले असते. टाकले दोन मेसेजेस की झाले काम! पण तरीही हे असले 'हार्ट टू हार्ट' संदेश पाठवणे कठीण कामच नाही का? तरीही हे होतच आले आहे. अगदी मोबाईलच काय .. पत्रे टाकणारे पोस्टखाते नव्हते तरीदेखील ही प्रेमपत्रांची देवाणघेवाण होतच होती ना! कबुतरे पण या कामी जुंपली जायची. आणि त्याही