आजारांचं फॅशन - 4

  • 7.1k
  • 2.9k

दोन दोन म्हणता म्हणता सहा सात पेग झाले पण मन अजून काय भरेना, चार वाजेला सुरु केलेला कार्यक्रम आठ वाजले तरी संपेना. “ये झालो हँग आता, मी चाललो घरी” अनिल ने शेवटचा घोट घेत आपला विचार किंबहुना निर्णय जाहीर केला. “अरे थांब आम्ही पण येतोय, आम्ही काय इथं राहायला आलोय का” घोरणे पप्या अनिलच्या खांद्यावर हात टाकत बोलला. “ये हे घे माझे पाचशे, तुम्ही इथं राहा, झोपा नाही तर खड्ड्यात जा मी चाललो” एवढं बोलून अनिल उठला आणि दात कोरत बाहेर येऊन रिक्षा थांबवली आणि सरळ घराकडे निघून गेला. पुढील दहा बारा मिनिटात रिक्षा अनिलच्या घराजवळ येऊन थांबली, अनिलने रिक्षाचे