राखणदार. - 3

  • 18.4k
  • 1
  • 10.6k

राखणदार प्रकरण - ३ दरवाजा उघडून आत्या घरात आली." तू झोपला नाहीस? इथं का उभा राहिलायस?" तिनं आश्चर्यानं विचारलं. तिची मैत्रीण मात्र टक लावून त्यांच्याकडे बघत होती. जणू काही तिला काहीतरी जाणवलं होतं. ती सर्वसाधारण स्त्री वाटत नव्हती. कपाळाला चंदनाचा टिळा, गळ्यात तुळशीची माळ मुखात हरीनाम---- तिला ते आत्मे एवढे का घाबरत होते ; हे तिला पहाताच तानाजीरावांच्या लक्षात आलं. दुस-या दिवशी सकाळी निघताना कधी एकटी घरात रहाणार नाही; असं वचन त्यांनी आत्याकडून घेतलं होतं. "तू आमच्याकडे अनंतपूरला येऊन रहा! आताच चल माझ्याबरोबर! इथे एकटीने रहायची काय गरज आहे? " त्यांनी आग्रह करून पाहिला. त्यांना आत्याची काळजी वाटत होती, पण