सकाळी साडे नऊ दहाच्या सुमारास अनिलचे डोळे उघडले, अनिल छातीला हात लावूनच उठला, आता ही नुसती दुखण्याची भीती असेल किंवा कदाचित छातीत दुखतही असेल, रात्रीची दारू आणि अबरचबर खाणं ह्या मुळे ऍसिडिटी तर होणारच ना, पण अनिलला साधी ऍसिडिटी देखील सिरीयस हार्ट अटॅक आहे असे वाटणे म्हणजे त्याच्या स्वभावाचा एक अविभाज्य घटक, अनिल बेड वरून उठला सरळ बाथरूम मध्ये गेला आणि दहा बारा मिनिटांमध्येच अंघोळ वैगेरे आटपून बाहेर आला, देव्हाऱ्या समोर जाऊन पूजा केली, आपल्या विशिष्ट शैलीत देवाच्या पाया पडला आणि सरळ पाणी पिण्यासाठी किचन मध्ये गेला, अनिलने असे कुठे तरी ऐकले होते की अंघोळ केल्या नंतर पाणी पिल्याने ब्लड