राखणदार. - 4

  • 16k
  • 1
  • 9.9k

राखणदार प्रकरण ४ तो माणूस काठी उगारून उभा आहे ; तो आता काठीचा आघात आपल्यावर करणार आहे हे तानाजीरावांनी पाहिलं; आणि सरळ-सरळ त्याला भिडले. त्या माणसानेही काठी फेकून दिली; आणि दोन हात करायला सुरूवात केली. काही वेळातच तानाजीरावांच्या लक्षात आलं की 'तो ' सुद्धा कसलेला पैलवान होता. प्रत्येक डावाला त्याच्याकडून प्रत्युत्तर मिळत होतं. " एवढा मोठा पैलवान अजून पर्यंत आपल्याला कोणत्याच कुस्तीच्या फडात दिसला कसा नाही?" तानाजीरावांना आश्चर्य वाटत होतं. पण त्यांना एका गोष्टीचं आश्चर्य वाटत होतं त्याला मारलेले ठोसे त्याचं शरीर चुकवून भलतीकडे जात होते. त्याला कितीही पकडायचा प्रयत्न केला; तरी तो हातातून निसटत होता. "कशी कुस्ती शिकलाय हा