राखणदार प्रकरण ५ "अहो! ही पेज तुमच्यासाठी बनवलीय! थोडीशी तरी पिऊन बघा! अंगात शक्ती येईल. तुम्हाला चवीला थोडं लिबाचं लोणचं पण देते! " कांता तानाजीने काहीतरी खावं म्हणून तिच्या परीने प्रयत्न करत होती. आपल्या पतीची गलितगात्र अवस्था बघून ओलावलेले डोळे नव-याला दिसू नयेत म्हणून खोटं हसत होती. "हो! दे मला थोडी पेज! पण आता नको. थोड्या वेळाने दे! " तानाजीला बायकोची काळजी कळत होती. पण इच्छा नसताना काही खावं असंही वाटत नव्हतं. "आता संध्याकाळ झालीय! तुम्ही दुपारीसुद्धा असाच बहाणा करून काही खाणं टाळलं! तुम्हाला काय खावंसं वाटतं; मला सांगा! मी बनवून देईन! पण असे उपाशी राहू नका! स्वत:ची तुम्ही काय