प्रेम भावनेचा मृदू रंग भरणारा व्हायरस - 7 - अंतिम भाग

  • 8.8k
  • 2.8k

क्रमशः-७.क्षणार्धात माझं अशांत मन शांत झालं. क्षणभर वाटले, की मी इतकं करतोय, पण अशा कठीण प्रसंगात ना मी कामी आलो ना माझा पैसा. फक्त पैसा नव्हे तर माणूसकीच माणसांच्या उपयोगी पडते याची जाणीव झाली. ओमिनी कार चालवणारा आण्णा काहीही विचार न करता जिकडे बोलेल तिकडे पैशाचा विषय न काढता आला. मेडीकलवाल्याने स्वतः त्या गावात नसतानाही इतक्या अंधारात आपल्या बायकोला अनोळखी लोकांसाठी मेडीकल उघडायला पाठवले आणि त्या माऊलीनेही आपल्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो याची जाणीव असतानाही रात्रीचे एक वाजता अंधारात येऊन मेडीकल उघडून माणूसकी दाखवली. दोन दिवसांत अनेकांनी फोन करून माझी खूशाली विचारली होती, पण सर्व जण स्वत:च्या स्वार्थासाठी फोन करत