अनिल गॅरेज वर पोहोचत नाही तर त्याचा एक कस्टमर जयराम पाटील आणि त्याचे कामगार त्याची वाट बघत होते. “अरे अनिल किती वेळ, कधीपासून वाट बघतोय” “काय झालं राव परत काय झालं का? “अरे गियर टाकायला प्रॉब्लेम होतोय, गियर अटकतायत” अनिल गाडीत बसला आणि चेक करायला लागला आणि गाडीत बसूनच बोलला. “साहेब क्लच प्लेट गेलीय” “नक्की? जयराम पाटलाने विचारले. “हजार टक्के, आत्ताच बदलून घ्या नाहीतर कुठे तरी रस्त्यात फसाल” अनिल गाडीतून उतरत उतरत बोलला. अनिल आपल्या कामात खूप तरबेज होता, त्याला सगळे लोक गाड्यांचा डॉक्टर बोलत, नुसतं एक वेळा बघून गाडीचा त्रास अचूक सांगणं आणि हात लावला की गाडी नीट केल्याशिवाय