कोणी बोलावले त्याला ? (भाग 3)

(15)
  • 20.8k
  • 1
  • 10.8k

मागील भागावरून पुढे...... किशोर चीं सगळे जाणून घेण्याची तीव्र इच्छा बघून आजी पण जराशी खुश झाली. पण जराशीच... कारण सगळे ऐकल्यावर त्याची काय प्रतिक्रिया येईल हे तिला ही माहित नव्हते. " बाबू... ! खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तेव्हातर तुझा जन्म पण झाला नव्हता. त्यात तुझे आजोबा पण अचानक गेले. पदरात चार लेकरं...घरची परिस्थिती बेताची मग काय करणार? शेवटी मी कंबर कसली आणी लागले कामाला... ""'छोटीशी वाडी आणी लहानशे शेत होते. त्यात मी मरमर काम करायची... कसेबसे चालले होते. पण एकटी बाई आणी कर्ता पुरुष नाही. हे लोकांना बघवत नव्हते. त्यामुळे उगाचच कुरापती काढणे त्यांनी चालू केले. "आजी किंचित दम खायला थांबली. "'आपले शेत