पोरका

  • 9.4k
  • 2.1k

वयाच्या तिशीत तिनं घर सोडलं. वैतागली होती ती त्या घरच्या जाचाला.... लग्नाला तीन वर्ष झाली, पण अजुनही मुलबाळ नाही म्हणुन ती नकोशीच होती त्यांना , इतरांशी हसुन खेळुन राहणं .. खुप सार्‍या गप्पा गोष्टी करणं, मन भरुन हसणं, त्यांना मुळीच नाही पटायचं.म्हणत की सभ्य ,संस्कारी लोकांचं चारचौघांत असं वागणं शोभत नाही, आता यात कुठले सभ्य संस्कारी लक्षणं आले त्यांनाच माहित...आता तर तिच्या शरीरावर वळही उठत होते....ती वाट मिळेल तिथे चालु लागलीआता अंधार पडला होता...सकाळपासुन चालुन तिचे पाय बोलु लागले होते. अजुन वीस - पंचवीस पावलांवर रेल्वे रुळ होता. तिथेच जावुन आपलं आयुष्य संपवावं असा विचार डोकावला तोच तिला तान्ह्या बाळाचा