असा हि हा अघोरी - 3

  • 8.3k
  • 4.3k

पण तरी देखील अमोघने दिलेल्या पर्यायाने तो प्रश्न सुटला होता म्हणून खूपच कौतुक करत होते सगळे आणि अमोघला एक नवीन ओळख देखील मिळाली होती अगदी त्याला हवी होती तशी. अमोघ ला फारच मजा वाटत होती. तो मनातून वाईट नसला तरी हे सगळं कौतुक आणि यश त्याला देखील हवंहवंस होतं. आणि महत्वाचं म्हणजे नंतर त्या वक्तीचं काय होतं ह्या कडे अमोघचं पूर्णपणे दुर्लक्ष झालं होतं. आता त्याने एका मागून एक सपाटाच लावला सगळ्या एक्सपर्टस बरोबर तसं करण्याचा. आणि आता त्याला सगळ्याच एक्सपेरिटीएस मिळत होत्या त्या मुळे तो फार बिझी देखील राहू लागला होता. त्यातुनच त्याच्या लग्नाची देखील तयारी चालूच होती एकीकडे.