कणकच्या स्वप्नातील कल्पनेची कथा - 1

  • 14.3k
  • 1
  • 6.3k

भाग-1 बर्‍याच दिवसांची परीक्षेला कंटाळलेली कणक मावशीचा फोन आल्याची चाहूल लागताच आनंदाने नाचू लागली."आपण आता मस्त मावशीकडेे पाचगणीला जाणार तेथेे राहणार ,मस्त मस्त पदार्थ खाणार ,खेळणार ,काकांसोबत शेतात जाणार,सई, ईशा ,कनिष्का सोबत खेळणार, रात्री जेवण झाल्यानंतर आजीची गोष्ट ऐकणार तीही भुताची,आमरसात तूप टाकून पुरण पोळी बरोबर खाणार सोबत सार भात आणि कुरडया वाह...! हे किती छान ,सगळं मनासारखं होईल..... मज्जाच मज्जा.... हुर्रे!!! आता आपली ही सारी स्वप्न सत्यात उतरण्यासाठी फक्त काही दिवसांची मुुदत हवी.एकदा की नई आपली परीक्षा संपली का....................,मी कशाचाच विचार न करता सरळ आपलं परभणी गाठणारं. पुढचा विचार आपण नंतर करूया आधी आपण परीक्षा सन्मार्गी लावुया...."