अनिलच्या जीवात जीव आला, त्याने लगेच फोन काढून सविताला सगळं नॉर्मल आहे सांगत बाईक काढली आणि औषध घेऊन सरळ घरी गेला. सविता बिचारी जागीच होती आणि अनिलची वाट बघत होती, दार वाजलं रात्रीचे दिड वाजले होते, तिला माहित होते अनिलच असणार तरी ती आतून बोलली, “कोण हे? “अग मीच आहे, एवढ्या रात्रीच कोण असणार हे? सविताने दरवाजा उघडून पहिला प्रश्न विचारला “काय बोलले डॉक्टर? ऍसिडिटी? “हं” अनिल कपडे काढता काढता तोंडातल्या तोंडात बोलला “मी सांगत होते काही नसल तरी स्वतःची पण अन दुसऱ्यांची पण झोप खराब केली, झोपा आता शांत” सविता बेडवर आडवी होत बोलली अनिलने देखील गोळ्या खाल्ल्या आणि