हा खेळ सावल्यांचा...

  • 4.8k
  • 1.2k

या गोष्टीची सुरूवात झाली ती साधारण पंधरा-वीस अब्ज वर्षांपूर्वी! एक प्रचंड ऊर्जेने भरलेला महाभयानक विस्फोट झाला. आणि अवघ्या ३ मिनिट ४६ सेकंदाच्या कालावधीत विश्वाचा जन्म झाला. प्रचंड उष्णता निर्माण झाली त्यावेळी... तापमान जवळपास ९० कोटी अंश सेल्सिअस झाले. त्यामुळे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन संलग्न होऊ लागले. पण न्यूट्रॉन मुळात अस्थिर!! त्यामुळे त्यांचे प्रोटॉनमध्ये रूपांतर होऊ लागले आणि त्यातून हायड्रोजनची निर्मिती झाली. काळ सरू लागला तसे हे तापमान कमी होत ३०० अंश सेल्सिअसपर्यंत कमी झाले. त्यामुळे हायड्रोजन व हेलियमसारख्या वायूंना स्थैर्य प्राप्त झाले. आणि या स्थैर्यातूनच काही अब्ज वर्षांत माझा जन्म झाला. मी... तुमचा लाडका मित्र भास्कर. मला तुम्ही रवी, दिनकर, आदित्य