अहमस्मि योध: भाग - ४

  • 12.1k
  • 1
  • 4.4k

त्या कागदावर आजोबांचं नाव वाचून समीर पुर्ण भांबावून गेला होता.. " समीर...ही कागदंं जरा विचित्रच आहेत...कदाचित प्राचीन लिपी मधे काहीतरी लिहलं आहे...आणि त्यातच हा दुसरा कागद एखाद्या नकाश्या सारखा दिसतोय..." - दिगंबर. समीरने ती कागदं हातात घेतला आणि निरखून पाहू लागला..त्याच्यावर नजर फिरवताच त्याच्या कपाळावर आठ्या उमटल्या होत्या. " या इतक्या भयान जंगलात हा वाडा..आणि इथे हे सगळं.. आजोबांचं नाव असलेल्या या कागदा वरून हे स्पष्ट आहे की याचा आपल्याशी काहीतरी संबंध नक्कीच आहे.." समीर म्हणाला. " बाकी अजून काही दिसत नाहीये इथे आपल्या कामाचं.." -दिग्या. "चल बाहेर जाऊन त्या गणपत कडून अजून काही माहिती मिळते का बघू.." - समीर.