आज पाऊस येईल वाटते सकाळपासून मळभ आहे... अजय विचारात बस स्टँडवर येऊन पोहोचला. अरेच्चा हे काय आज इथे कोणीच कसे काय नाही... रस्त्यावर माणसांची वर्दळही फारच कमी आहे... अजय रस्त्यावर दूरवर नजर टाकत म्हणाला. जाऊदे ना आपल्याला काय उलट आरामात बसून घरी पोहचेन नाहीतर काय त्या बसमध्ये गर्दी असते... अजय विचारात होताच कि इतक्यात वारा जोरात वाहू लागला. वातावरणात बराच फरक अजयला जाणवला.घरी पोहोचेपर्यंत पाऊस नको येऊदे रे देवा... अजयच्या मनात विचार चालूच होता इतक्यात त्याला समोरून एक मुलगी स्वतःची ओढणी सावरत येताना दिसली. ती मुलगी अजय थांबलेल्या बस स्टँड जवळच येत होती.सायली..?? हो सायलीच..!! समोर सायलीला बघून अजयचे ह्रदय