अंतःपुर - 2

(14)
  • 15.6k
  • 3
  • 9.9k

२. अकस्मात आघात (एक्सिडेंटल बफे्)...सकाळी साडे आठ वाजता शक्तीची बाईक सेंट्रल जेलला लागली. सेंट्रल जेल कळंबापासून पाचशे मीटर व्यासाचा परिसर लॉकडाऊन करून टाकला होता. कोणी आत व बाहेर येऊ जाऊ शकत नव्हतं! जवळ असलेल्या बिल्डिंग्स्, दुकाने पूर्णपणे बंद करण्याचे आदेश आधीच देऊन ठेवले होते, जी दुपारपर्यंत काही खुली होणारी नव्हती... तेथे आलेल्या एसआयटी व जेल अधिकाऱ्यांशिवाय व जेलमधील कैद्यांशिवाय तिथं चिटपाखरू देखील नव्हतं. जेलला लागून हायवे असूनही सगळं चिडीचूप शांत होतं... बाहेर कोल्हापूर पोलीस अधीक्षक सुशेन मित्र, आयबी डिरेक्टर शौर्यजीत वाबळे, पब्लिक प्रोसेक्युटर जयंत राऊत व वाचस्पती यांच्या कुटूंबाने व 'जनमानस पक्ष' या त्यांच्या पक्षाने संमतीने, एकमताने निवडलेले मुंबई हायकोर्ट ऍटर्नी