सकाळी सहाच्या ठोक्याला उशाशी ठेवलेल्या घड्याळात अलार्म वाजला व तिने लगेचच आपले डोळे उघडले. जणू काही ती केव्हांची जागीच होती व डोळे बंद करून अलार्म वाजण्याची च वाट पाहत होती. तिने लगेचच आपल्या अंगावरील चादर बाजूला केली व अंथरुणात उठून बसली. उठून बसल्यावर तिने आपल्या शेजारच्या रिकाम्या जागेत व कुशीवर हळुवार हात फिरवला व स्वतःशीच हसली पण लगेचच उठून तिने आवरायला घेतलं. उठून तिने तिच्या चादरीची घडी घातली व व्यवस्थित जागेवर ठेवून दिली. आंघोळ करून झाल्यावर तिने गॅलरीतील तिच्या आवडत्या मोगऱ्याच्या झाडाला पाणी घातले. किचन मध्ये जाऊन तिने स्वतःसाठी मस्तपैकी चहा ठेवला व सवयीप्रमाणे दोन कप घेतले