आजारांचं फॅशन - 11

  • 5.7k
  • 2.1k

डॉक्टरने एक्सरेची चिट्ठी अनिलच्या हातात देत अनिलला यायला आणि फी बाहेर द्यायला सांगितले. अनिल क्लीनिकच्या बाहेर येऊन केमिस्ट शॉप वर औषध घेण्यासाठी गेला, औषध घेता घेता तो कसला तरी विचार करत होता, कोण जाणे त्याच्या मनात काय आले आणि अचानक त्याने औषध देणाऱ्या मुलाला एक्सरे ची चिट्ठी दाखवत ते एक्सरे सेंटर कुठे आहे ते विचारलं “ते काय समोरच्या बिल्डिंग मध्ये” अनिलने मागचा पुढचा विचार न करता सरळ एक्सरे सेंटर वर गेला, डॉक्टरने जरी त्याला दोन दिवस खोकला कसा आहे हे बघायला सांगितले होते तरी एवढा धीर धरेल तर ते अनिलच डोकंच कसलं. “एक्सरे काढायचंय” अनिल हातातली चिट्ठी रिसेप्शन वर बसलेल्या