अंतःपुर - 3

(20)
  • 13k
  • 1
  • 7.9k

३. अधिकृत नियुक्ती (ऑफिशियल अपॉईंटमेंट)...हॉस्पिटल बेडवर पडलेल्या असॅसिनने डोळे उघडले तेव्हा शक्ती त्याच्या समोरच कोचवर बसलेला होता. स्पेशल वॉर्डमध्ये या खास पाहुण्याची खास सोय केली होती. "बोलतं व्हा!" शक्ती त्याला शुद्धीवर आलेला पाहून म्हणाला!असॅसिनने नकारार्थी मान हलवली."हॉस्पिटल्समध्ये एक्सिडेंट्स होऊ शकतात! नाही?!" शक्ती धमकीचा सुरात म्हणाला."मला माहित नाही कोणी? मला... मला फोनवरून इन्स्ट्रक्शन्स दिल्या होत्या... त्यांनीच सगळी... सगळी... सोय केली... केली... होती..." असॅसिन कष्टाने म्हणाला.तो बोलला तसा तोंडावर व्हेंटिलेटरचा मास्क असल्याने त्याचा तो अस्पष्ट आवाज नुसताच घुमल्यासारखा झाला व त्याच्या श्वासाच्या वाफेनं त्या मास्कवर बाष्प जमा झाल्यासारखं झालं.शक्तीने उठून चढवलं जात असलेलं रक्त बंद केलं. मग तो व्हेंटिलेटरजवळ गेला... आणि स्विच ऑन-ऑफ