कोणी बोलावले त्याला ? (भाग 5)

(33)
  • 18.5k
  • 1
  • 8k

मागील भागावरून पुढे.... जसे श्याम आणी संपत ने बाहेरून तांदळाचे रिंगण घातले. त्यांनी मोबाईलच्या फ्लॅश लाईट ने त्यांना इशारा केला. श्याम आणी संपत आपल्या गळ्यातील तावीज घट्ट पकडून उभे होते. जसा संपत आणी श्यामचा इशारा मिळाला तसा किशोर त्वरेने आजी कडे आला. " आजी त्याचा बाहेर जायचा रस्ता बंद केला आहे." किशोर उत्साहात म्हणाला. " ठीक आहे. चल आता वेळ आलीय... " आजी पण म्हणाली. आता तिच्या जीर्ण शरीरात काहीशी तरतरी आली. आजी त्या दोघांच्या पुढे दरवाजा उघडून बाहेर आली. आणी तिच्या मागे किशोरने बाहेर पाय ठेवला आणी तो दचकला. समोर असलेला समंध बघून त्याची बोबडी वळली. दहा एक फूट उंच , भक्कम शरीर