आजारांचं फॅशन - 13

  • 4.7k
  • 1.6k

"बसा गोरे साहेब बसा" निखिल बहिरेने अनिल साठी बाजूने खुर्ची ओढत बोलला. " नई नई तुम्ही चालू द्या, मी नई घेणार, बाळ्याला भेटतो अन जातो मी" "अरे एक पेग मार अन जा भेटून त्याला, त्याला किती वाईट वाटल तू नई पिला तर" घोरणे पप्या शेंगदाण्याचे दाणे तोंडात टाकत बोलला "त्याला काही नई वाईट बिट वाटत, तू राहूदे" अनिल ने खुर्चीवर बसत उत्तर दिले "अरे आता बसलायस तर घे एक पेग, काय नई कळत घरी एक पेग नि' शार्दूल ग्लास भरत भरत बोलला. आता मैफिल रंगलेली होती, सगळे मित्र जमा झालेले होते, बाजूला डि जे वर गाणे वाजत होते आणि महत्वाचं