अहमस्मि योधः भाग -५

  • 12.4k
  • 2
  • 4.4k

घरातून निघून समीर रेल्वे स्टेशनकडे चालत निघाला. आसपास नीरव शांतता पसरली होती..रस्त्यावर काही ठिकाणी दुकानांच्या बंद शटर बाहेर झोपलेली माणसं होती. अधूनमधून एखाददुसऱ्या कुत्र्याचे भुंकणे ही ऐकू येत होते. अचानक पावसाची रिमझीम चालू झाली..घाईगडबडीत निघाल्यामुळे समीर छत्री सोबत आणायला विसरला होता..पावसाची पर्वा न करता त्याने रेल्वे स्टेशनकडे धाव घेतली. थोड्यावेळाने तो रेल्वेच्या फलाटावर पोहोचला आणि तिकीट काढून घेतलं. ट्रेन अजून आली न्हवती म्हणून त्याने स्थानकावरील चहा विक्रेत्याकडून चहा घेतला. चहाने त्याला थोडी तरतरी आली पण तरीही झोप नसल्याने त्याचे डोळे लाल झाले होते. तितक्यात त्याला लांबून ट्रेन येताना दिसली आणि तो ट्रेन पकडण्यासाठी थोडा सावध झाला. ट्रेन मध्ये जास्त गर्दी