कादंबरी –प्रेमाविण व्यर्थ हे जीवन भाग –१५-वा ------------------------------------------------------------------------------------------------------------- गेल्या आठवड्यातील अनेक गोष्टी अनुशाच्या मनाप्रमाणे घडून येत होत्या , एका पाठोपाठ घडून येणाऱ्या अशा सुखद प्रसंगातली ..भेट होती ..ती अभिजितच्या ताईच्या वाढदिवशी झालेली ताईंची भेट. या भेटी नंतर अनुषा आणि ताई मनाने खूप जवळ आल्या . ताईला विश्वास वाटू लागला होता ..की ..ही अनुषा आपल्या वडिलांच्या मनातील दुराग्रहाला नक्कीच एक छान वळण देण्यात यशस्वी होणार . चांगल्या गोष्टी होण्यासाठी ..वेळ मात्र खूप उशिराने येत असते “हेच खरे .. आणि त्याची प्रतीक्षा करण्यातच मनाची मोठी परीक्षा असते . तसे पाहिले तर ..आपले जगणे ,आपले आयुष्य हीच एक मोठी कसोटी असते “,ही वाटचाल