आजारांचं फॅशन - 15

  • 6.4k
  • 2.1k

गॅरेज जवळच्या हॉटेल मध्ये जाऊन त्याने मिळेल ते खाऊन पोट भरले आणि कामाला लागला. दिवसभर काम करता करता त्याने शेकडो वेळा फोन खिशातून काढला आणि परत ठेवला, जणू काही तो सविताच्या फोनची वाट बघत होता. रात्री थकून भागून घरी गेला, दार वाजवले, आणि क्षणात लक्षात आले घरात कोणी नाही, कुलूप उघडून घरात गेला, स्वतःच्या हाताने पाणी घेतले, सोफ्यावर बसला आणि पाणी पिता पिता संपूर्ण घर नेहाळायला लागला, खाली घर आ वासून खायला उठत होत, दोन घटका देखील घरात थांबूशी वाटत नव्हतं, थोडा वेळ तसाच एखाद्या पुतळ्या सारखा बसला आणि मग डोक्यात जेवणाचा विचार आला, तो सकाळी खाल्लेल्या एका मिसळ आणि