कोणी बोलावले त्याला ? ( भाग 6 )

(24)
  • 14.5k
  • 1
  • 6.7k

मागील भागावरून पुढे..... दुसऱ्या दिवशी किशोर मुंबईला जायला निघाला. जाण्या आधी तो काही वेळ आजी बरोबर बोलत बसला होता. " बाबू ! सगळ्यांना एकदा घेऊन ये इकडे... खूप वर्ष झाली कोणी इकडे फिरकले नाही. "" आजी ! मी माझा पूर्ण प्रयत्न करीन. "" बाबू ! अजून पण खुप काही गोष्टी आहेत ज्या मला तुम्हाला सांगायच्या आहेत. सगळे इकडे आले तर मला त्यांना त्या समजावून सांगता येतील... त्यात त्यांचेच भलं आहे... "" मी समजावून सांगीन त्यांना.. आणी आता तर इथे येण्यात काही धोका पण नाहीय. त्यामुळे त्यांना इकडे यायला काहीच अडचण नसावी असे मला वाटते आहे. आणी शेवटी तु त्यांची आई , आजी आहेस