अपराध कुणाचा, शिक्षा कुणाला? - 3

(11)
  • 7.3k
  • 3.6k

(३) अपराध कुणाचा, शिक्षा कुणाला? त्यानंतरच्या आठ दहा दिवसांची गोष्ट. वामनरावांच्या घरातील वातावरण पूर्ण नाही पण काही प्रमाणात सुधारले होते. गप्पाष्टके रंगत नसली, हसणे बागडणे होत नव्हते तरीही दुःखाची छाया असूनही मोकळेपणा येत होता. यामागे होती आशा! ती दररोज मुद्दाम दोन्हीवेळा लताच्या जेवणाच्या वेळी येत होती. स्वतः दोन घास खाऊन लताला पोटभर जेऊ घालत होती. त्यादिवशी दुपारचे चार वाजत होते. विमलाबाई चहाची तयारी करीत होत्या. सुट्टी असल्यामुळे वामनराव घरीच होते. तितक्यात घरासमोर थांबलेल्या कारमधून आशासह एक तरुण आणि एक तरुणी उतरली. वामनरावांनी सर्वांचे स्वागत केले. सारे जण सोफ्यावर बसताच आशा म्हणाली,"ओळख करून देते. हे वामनकाका, ह्या