गावाची आठवण

  • 6.6k
  • 1
  • 1.7k

वीस-पंचवीस वर्षानंतर आज शेखरला गावाकडे जाण्याचा योग आला. कारण ही तसेच होते. त्याचा जीवाचा जिवलग मित्र राजेशच्या मुलीचं लग्न होतं. राजेश आणि शेखर लहानपणापासून एकाच वर्गात शिकलेले. घराच्या बाजूला त्याचे घर. एकत्र खेळायचे, जेवायचे आणि एकत्रच राहायचे. त्यांच्या दोघांची मैत्री संपूर्ण गावाला माहीत होतं. वीस दिवसांपूर्वी राजेश स्वतः पत्रिका घेऊन शेखरच्या घरी गेला होता. लग्नाला सहकुटुंब सहपरिवार येण्याचं आमंत्रण देऊन गेला. म्हणून तो आपल्या परिवारासह गावाकडे जाण्यास भल्या पहाटे आपली गाडी घेऊन निघाला. गाडी ज्या वेगात जात होती त्याच वेगात त्याचं मन देखील गावात जाऊन पोहोचलं होतं. लहानपणी असलेलं गाव आज तसंच असेल काय ? काय काय बदल झाला असेल