H2SO4'By sanjay kambleपंधरा दिवसावर दिवाळी आलेली पन अवेळीच पाऊस कोसळत होता. तसा एक नेहमीचा दिवस, विशाल college ला जाण्याची तयारी करत होता. त्याचे वडिल मोलमजुरी करून कुटुम्बाचा उदर निर्वाह चालवायचे तर आई काही घरांमधे धुनभांडी करून मुलांच्या शिक्षणाला पैसे जमवायची. त्याचे मित्र प्रकाश (पक्या), सचिन, बंडू सर्वाची परिस्थिति सारखीच पण आईवडिलांच्या कष्टाची किंमत नसलेल्या आजच्या पिढीतल्या काही मुलापैकी हे होते.विशाल ने पायातले बुट घालतच आईला आदेश दिला, " थोडे पैसै दे, मित्राना पार्टी द्यायची आहे..." मुलाच्या हट्टासाठी तीने ही घर खर्चा साठी ठेवलेले पैसे त्याच्या हातात दिले आणि 'सांभाळुन गाडी चालव' म्हणत आत गेली.... नेहमी प्रमाने आईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत विशाल