शहाणा - 1

  • 4.9k
  • 1.5k

आज रविवार, सुट्टीचा दिवस. मस्त खा प्या लोळत राहा. मला काय खरेतर सगळॆ दिवस सारखेच. थोडे दिवस झाले आता निवृत्त होऊन. 25 वर्षांपूर्वी शिक्षक म्हणून लागलो आणि कशी वर्षे सरली कळलेच नाही. शाळा, शाळेतील मुले ह्यातच पूर्ण आयुष्य वेचलं. शाळेतील मुले पण असाधारण, मतिमंद म्हणू नये स्पेशल चाईल्ड. दया यायची त्यांच्याकडे बघून, त्यांच्या पालकांना पाहून. पण जबरदस्त आकलन क्षमता आणि मेहनत घेणारी मुले. तेवढीच निरागस, गोंडस.