८. लोकशाहीची मूलभूत तत्वे (फंडामेंटल्स ऑफ डिमॉक्रसी)...हॉटेल बाहेर शक्ती सांगत असलेली सूचना समजून घेऊन मिहीर पंतप्रधानांच्या रूमसमोर येऊन उभारला."मिहीर. पीएम सरने बुलाया हैं।" मिहीर बाहेरील एजंट्सना म्हणाला.एजंटने आत जाऊन कन्फर्म केलं."सर, एक आदमी आया हैं। कह रहा है आपणे बुलाया हैं! नाम मिहीर!""भेज दो!" पीएसोबत डायनिंग टेबलवर जेवण करणारे पीएम काट्याने घास घेत म्हणाले.एजंट बाहेर आला."जाईए!" दार उघडच ठेवून तो मिहीरला म्हणाला.मिहीर रूममध्ये प्रवेशला."मिहीर देशमुख रिपोर्टिंग सर!" तो सल्युट करत म्हणाला.तो पंतप्रधानांना तो जेवताना पाहत होता."सॉरी सर. बाद मे आऊँ?" त्याने संकोच करत विचारलं."नाही! थांब!" नॅपकिनला हात पुसत पीएम खुर्चीतून उठले.मिहीरकडे आले. "आह! शुक्ला, मिट आवर् न्यू रिक्रुट फ्रॉम आयबी! मिहीर,