नवनाथ महात्म्य भाग १३

  • 10.7k
  • 3.6k

नवनाथ महात्म्य भाग १३ शेवटीं पिंगळेने राजास बोध केला कीं, माझ्या विरहानें तुम्हास दुःख झाले ही गोष्ट खरी आहे. परंतु अशाश्वताचा भार वाहणे व्यर्थ होय. यास्तव आतां माझा छंद सोडून देऊन तुम्ही आपल्या देहाचे सार्थक करून घेऊन मोक्षाची प्राती करून घ्यावी. फक्त माझा ध्यास धरल्यानें तुम्ही मुक्तीला मात्र अंतराल. हे सर्व पाहून राजास विस्मय वाटला. मग भर्तृहरी राजाने गोरक्षानाथाला ओळखले व तो पाया पडण्यासाठीं धांवला. तेव्हा गोरक्षनाथाने त्यास सांगितले, “राजा, माझा गुरु मच्छिंद्रनाथ हा दत्तात्रेयाचा शिष्य आहे व तुलाही त्या दत्ताचाच अनुग्रह झालेला आहे.” तर तू माझ्या गुरुचा बंधु आहेस म्हणून मला गुरुस्थानी आहेस, सबब मी तुझ्या पाया पडणे